राजूर कॉलरी चा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!
Sangini News
वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतांना गटार नाले साफसफाई कडे ग्रामपंचायत चे सातत्याने दुर्लक्ष होते . याविरुद्ध दिशा पाटील यांनी एल्गार पुकारला आहे.Rajur Colliery's health issue is on the air!
मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर कॉलरी ची दैनावस्था झाली आहे. याआधी माजी सरपंच प्रणिता मो असलंम यांनी प्रशासनावर पकड ठेवीत ग्रामस्थांना सुविधा कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले आहेत.
इतकेच नव्हे तर स्मशानभुमी जागा,विद्यार्थ्यांना वाचनालय असे ना-ना तर्हेचे उपक्रम राबविले.यातूनच विद्यार्थ्यांना बळ मिळाले. सज घडीला ग्रामसेवक 3 स्टार हॉटल टाकून मोकळे झाले आहेत. याला कारणीभूत येथील प्रशासन आणि पुढारी आहेत.
डेव्हिड फक्त अन फक्त चिरीरिमिरीत दंग असल्याने जणू महेंद्रला पाठबळ देतो की काय?असा प्रश्न उपस्थित होते आहे.
एकूणच राजूर कॉलरी येथील आरोग्याचा विचार कृंनशुद्ध पाणी,तुंबलेले गटार नाले साफसफाई करून देण्याची मागणी सदस्य दिशा पाटील व सहकाऱ्यांनी केली आहे.

